
बीड BEED – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी GRAMPANCHYAT निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत साठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथे नऊ सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केल्याची माहिती आहे अनिल मकाळ, माजी सरपंच यांनी दिली.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















