Home Breaking news Arvind Kejriwal : केजरीवालांना मोठा दिलासा

Arvind Kejriwal : केजरीवालांना मोठा दिलासा

0

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळं केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. ईडीच्या (ED) खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. या प्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांचे खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यावरुन सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर आज यकेजरीवालांना जामीन मंजूर झाला आहे.

देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम, शरद पवारांची पोस्ट चर्चेत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांनी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल हे 177 दिवसानंतर तुरूंगाच्या बाहेर येणार

अरविंद केजरीवाल हे जवळपास 177 दिवसानंतर तुरूंगाच्या बाहेर येणार आहेत. शिवाय त्यांना 10 लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला होता. प्रचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा तरूंगात जावे लागले होते. आता त्यांना रितसर जामीन मिळाला आहे.