
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा
Bihar CM Nitish Kumar submitted resignation to Governor
पाटणा, 28 जानेवारी – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार Bihar CM Nitish Kumar यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर Rajendra Arlekar यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. बिहारमध्ये राजद आणि जदयु आघाडी सरकार होते. पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून नुकताच घेण्यात आला. दरम्यान भाजपा आणि जदयु या आघाडी सरकारचा शपथविधी आजच होणार असल्याची माहिती आहे. नितीश कुमार यांच्यासह सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपाचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
महाआघाडीत परिस्थिती योग्य नसल्याने राजीनामा – नितीश कुमार
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच काम राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे आणि राज्यातील सरकार बरखास्त करण्याची विनंती केली. तसेच आता यापुढे आम्ही आय.एन.डी.आय.ए. आघाडीमधून बाहेर पडणार आहोत.
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नितीश कुमार हे नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासह नऊ मंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यामुळे आता बिहारमधील राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे. याचसाठी बिहारचे प्रभारी विनोद तावडे पाटण्यात पोहोचले आहेत.
जदयुची पुनर्रचना
नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जदयुची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पक्षीय बलाबल
बिहार विधानसभा २४३ सदस्यांची आहे. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाला ७९ जागा मिळून तो सर्वांत मोठा पक्ष ठरला. दुसऱ्या स्थानावर भाजपाला ७८ जागा मिळाल्या. तिसऱ्या स्थानावर जदयु अर्थात नितीश कुमारांच्या पक्षाचे ४५ आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसकडे १९ आमदार आहेत.