
Bhandara accident crime
भंडारा (bhandara ), ३ एप्रिल, :- भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर सिहोरा राज्य मार्गावरील डोंगरला येथे घडली. अतुल मीताराम घुर्वे वय (४०)वर्ष, रा. तीलक नगर तुमसर ता.तुमसर जि.भंडारा असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अतुल व त्याचा मित्र राम हे त्याच्या दुचाकी ने सकाळी तुमसर वरुन डोंगरला जात होते.
दरम्यान डोंगरला गावाजवळ ट्रक चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवुन मृतक व त्याच्या मित्राला मागेहुन ट्रक ने कट मारुन गंभीर जखमी केले. मृतक अतुल व त्याच्या मित्राला उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी केली. अतुल ला मृत घोषित केले.तर मृतकाचा मित्र राम धुर्वे जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















