Vidhansabha : लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादी

0

२३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक

भाजपच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक होणार

विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच काही पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ सप्टेंबरला भाजपच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक होईल. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अन्य नेते उपस्थित असतील. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, भाजपकडून ५० उमेदवारांच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांसह कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा