आरक्षणाच्या मागणीसाठी ते दोघे चढले टॉवरवर, दिला इशारा

0

 

बुलढाणा BULDHNA  – आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 8 वा दिवस आहे. प्रशासनाने दखल न घेतल्याने 2 आंदोलकांनी बाजूलाचं असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून आज आक्रमक आंदोलनाला सुरुवात केली आहे.

या आंदोलनाच्या समर्थनात समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत यांनी समर्थन दिले असून बुलढाण्यात आंदोलनात सहभाग घेतला आहे. तीन तासात शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करू असा, इशारा यावेळी आंदोलक भगवान पवार, जालिंदर बुधवत, जिल्हाध्यक्ष शिवसेना (उबाठा गट) यांनी दिला.