
अमरावती AMRAWATI -मंत्रालयावर घेराव घालण्यासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी अडवले. आपल्या विविध मागण्यांसाठी हे मंत्रालयावर धडक देण्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त निघाले होते. यासंदर्भात काल रात्रीपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चारही बाजूंनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ दिले नाही. त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावर बसूनच ठिय्या आंदोलन सुरु केले.काल मुंबईत मंत्रालयाला घेराव करण्यासाठी निघालेले प्रकल्पग्रस्त शेतकरी
मुंबई मंत्रालयावर आंदोलन करण्यास ठाम होते. मागील चार महिन्यापासून मोर्शी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.सध्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती उमेश शाहने, प्रकल्पग्रस्त यांनी दिली.