Home Top News कॅग’द्वारे गडकरींचा राजकीय काटा काढण्याचे प्रयत्न-वडेट्टीवार

कॅग’द्वारे गडकरींचा राजकीय काटा काढण्याचे प्रयत्न-वडेट्टीवार

0

मुंबई- कॅगच्या अहवालातून केंद्र सरकारच्या योजनांतील अनियमितांवर बोट ठेवण्यात आले असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजकीय काटा काढण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, कॅगचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून गडकरींचा काटा काढण्यात येत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. गडकरी यांची प्रतिमा स्वच्छ आहे व विकासाची आहे. त्यातून त्यांना साईडट्रॅक करायचे व त्यांचे राजकारण संपवायचे, हा डाव असू शकतो, असे वडेट्टीवार म्हणाले. घोटाळा झालेल्या विभागातील रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे ते म्हणाले.