राज्यांना ऑक्सिजन सिलिंडर्स, व्हेंटीलेटर्स तयार ठेवण्याच्या केंद्राच्या सूचना

0

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या प्रसारामुळे हाहाःकार माजला आहे. एकाच दिवसात तब्बल ३.७ कोटी रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना नव्याने तयारीत राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. राज्यांसाठी सहा मुद्यांचा समावेश असलेली अॅडव्हायजरी जाहीर करण्यात आली असून त्यात राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Centre issues advisory to all States to ensure Covid19 mitigation measures) देशात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. रुग्णसंख्येत किरकोळ वाढ होत असली तरी भविष्यातील संकट टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून केंद्राने राज्यांना तयारीत राहण्यासाठी निर्देश दिले आहे.
केंद्राने नव्याने काढलेल्या अॅडव्हायजरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा सक्रीय करण्याबाबतचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती करणारे प्लॅंट्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
विमानतळावर तपासण्या
दरम्यान, चीनसह जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. तसेच चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा