राज्ययपालांच्या ताफ्याला शिवसैनिकांकडून चपला दाखविण्याचा प्रयत्न

0

पोलिसांनी घेतले ताब्यात ; काही काळ तणाव


अमरावती. राज्यापाल भगत सिंह कोश्याकरी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तकव्यांतचे पडसाद अजूनही उमटतच आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शनिवारी प्रचंड घोषणाबाजी करीत राज्यंपालांच्याद वाहनाच्या ताफ्याला चपला दाखविण्यारचा प्रयत्नी केला. महाराष्ट्री आणि मध्ययप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांच्या (Border districts of Maharashtra and Madhya Pradesh) प्रश्नांवर शनिवारी येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्याकरी आणि मध्यी प्रदेशचे राज्यबपाल मंगूभाई पटेल (Governor Mangubhai Patel) यांच्याह उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यादत होते.या बैठकीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे विद्यापीठमार्गे जात असताना द्रूतगती महामार्गावरील पुलाजवळ उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी प्रबोधिनीमध्येे शिरण्याचा प्रयत्नव केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. शिवसैनिकांनी निषेध म्हमणून ताफ्याला चपला दाखविण्याचचा प्रयत्नन केला. पोलिसांनी आंदोलन करणा-या शिवसैनिकांना लगेच ताब्याधत घेतले.
या आंदोलनाचे नेतृत्वय शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा महाविकास आघाडीने निषेध केला होता. ठिकठिकाणी त्याा विरोधात आंदोलने केली जात आहेत. राज्यपालांच्या अमरावती भेटीदरम्यान देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याजचे पहायला मिळले. त्यांनी कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा ताफा जिथून येणार होतो. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चपला दाखनवून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न होता. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांना चांगलीच दमछाक झाली. अचानक झालेल्या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन राज्यपालांची बैठक
सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दरम्यान आज महत्त्वाची बैठक अमरावतीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांसंदर्भात तसेच येथील गुन्हेगारीविषयक कारवायांवर अंकुश ठेवण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे समोर आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा