पराभव जिव्हारी, दोघांवर जीवघेणा हल्ला

0

माजी सरपंचाच्या भावाचा प्रताप ; अकोल्यातील खामखेड गाव हादरले


अकोला. जिल्ह्यातील पातुर जवळील खामखेड गावातून (Khamkhed village near Patur ) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी (Defeat in the election) लागल्याने एका व्यक्तीने हातात तलवार घेत संपूर्ण गावात दहशत (Terror in the whole village with sword in hand ) माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर दोन जणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरेश गुंजकार असे पराभूत उमेदवाराचे नाव असून तो खामखेडा गावाचे माजी सरपंच बाबुलाल गुंजगाड यांचा भाऊ आहे. दहशत माजवल्यानंतर सुरेश गुंजकार फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीत बाबुलाल गुंजकार यांचे पॅनेल पराभूत झाले. हा पराभव जिव्हारी लागल्यानेच सुरेश गुंजकार यांनी संपूर्ण गावात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हीडियो व्हायरल होतो आहे.
आरोपी हातात तलवार घेऊन रस्त्यावरून फिरत होता. यावेळी दोन जणांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता सुरेश यांनी त्या दोघांवरही हल्ला केला. यात दोघे जण गंभीर जखमी झाले. कृष्णा राजीव काळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शुक्रवारी संपुर्ण गावात दहशतीचे वातावरण होते. पातुर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, अकोल्यातील २६५ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची प्रक्रिया मंगळवारी (ता.२०) सात तालुक्यांमध्ये पार पडली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासाठी ९३६, तर सदस्य पदासाठी ३ हजार ८६७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. मतमोजणीच्या दिवशी मतदारांनी काही ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र कौल दिला. तर काही ग्रामपंचायतींमध्ये संपूर्ण पॅनलच निवडून आले.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून, काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त निवडणुकीत मतदारराजाने एकाच पॅनलला निवडून न देता संमिक्ष कौल दिला आहे. दरम्यान गावकारभारी व सदस्यांच्या विजयानंतर उमेदवार व त्यांच्या समथर्कांकडून जल्लोष सुद्धा करण्यात आला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा