
गोंदिया – केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटना द्वारा बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन आणि साखळी उपोषण गेल्या दहा जानेवारीपासून सुरू आहे. केंद्र शासन जोपर्यंत हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूचं राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आज उपोषनाला बसून एवढे दिवस झाले तरी देखील कोणत्याही जनप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली नसत्याची खंत यावेळी आंदोलकांनी बोलून दाखवली, यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.