छत्रपती संभाजीनगर-समृद्धी महामार्गावरील अपघातस्थळाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथून सिंदखेडराजाकडे रवाना झाले आहेत. लवकरच ते घटनास्थळावर पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडूनही 2 लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.Chief Minister, Deputy Chief Minister went to the accident site, condolence from Pant Pradhan
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. अपघातस्थळाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले असूून येथून ते अपघातस्थळाकडे रवानाही झाले आहेत. हे दोन्ही नेते सिंदखेडराजा येथे जखमींची विचारपूस करतील, अशीही माहिती मिळत आहे. अपघातात आग लागून त्यात मृतदेह जळाल्याने गरज पडल्यास डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटविली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.