मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला

0

(New Dillhi)नवी दिल्ली : दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले (Maharashtra Chief Minister Eknath Shinde)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब (Prime Minister Narendram Modi)पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील (Sambhaji Shinde)संभाजी शिंदे, पत्नी (Lata Shinde)लता शिंदे, मुलगा खासदार (Shrikant Shinde) श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी असे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. ” पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ही सदिच्छा भेट आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी ही भेट होणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत. आठवडाभरात मुख्यमंत्र्यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे.
गेल्या मंगळवारी एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (Ajit Pawar)अजित पवार या तिघांची (Union Home Minister Amit Shah)केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत.