समृद्धी महामार्गावर वाहनचालकांची अल्कोहोल चाचणी होणार

0

(Mumbai)मुंबई– वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी (Samriddhi Highway)समृद्धी महामार्गावर आता लवकरच वाहन चालकांची अल्कोहल टेस्ट होणार असून, अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. काटेकोरपणे वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी पावले टाकली जाणार असल्याची माहिती (Public Works Minister Dada Bhuse) सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिलीय. काल भुसे यांनी नागपुरात येऊन समृद्धी महामार्गाची पाहणी केली व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली. या पार्श्वभूमीवर माहिती देताना भुसे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर (Buldhana)बुलढाणा येथील सिंदखेडराजाजवळ एका खाजगी बसचा अपघात झाला होता. या भीषण अपघातात 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघातात चालकाने मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमागे मानवी चुका असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आजवर समृद्धी महामार्गावर 32 लाख वाहने धावली असून याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे, असे भुसे म्हणाले.