(Mumbai)मुंबई– विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी सहकारी पक्षांची चर्चा सुरु असल्याने निवडीला विलंब होत असल्याचा दावा (Congress state president Nana Patole)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. पावसाळी अधिवेशनला सुरू होऊन जवळपास एक आठवडा उलटला असताना अद्यापही विरोधी पक्षांची निवड शक्य न झाल्याने वेगळीच चर्चा सुरु आहे. काँग्रेसमध्ये या पदासाठी स्पर्धा सुरु असल्याने विलंब लागत असल्याची चर्चा असून नाना पटोले यांनी मात्र ते कारण नाकारले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून (Ajit Pawar)अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्यानं आता या पदावर आता काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. मात्र विरोधी पक्षनेता निवडीला विलंब होत असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पटोले यांनी यासंदर्भात सांगितले की, दोन्ही सभागृहात आता आमचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये आमच्या हायकमांडने सहकारी पक्षाला विचारून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला वेळ लागत आहे. या आठवड्यात यावर नक्की निर्णय होईल, असे पटोले म्हणाले.