मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ, मुंबईच्या माजी महापौरांना अटक

0

 

(Mumbai)मुंबई: जाहीरसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी व शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात ठाकरे गटातील नेते व मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीनंतर त्यांना अटकही करण्यात आली. (Shiv Sena Leader Datta Dalvi Arrested)

ठाकरे गटाच्या वतीने रविवारी भांडुपमध्ये जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपाधीवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी त्यांना शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (Bhushan Palande, Sub-Divisional Head of Shinde Group)शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.त्यानुसार भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३ (अ), १५३ (ब), १५३(अ)(१) सी, २९४, ५०४, ५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला. भांडुप पोलीसांनी दत्ता दळवी यांना अटक केली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने साळवी यांची पाठराखण केली आहे. भांडूप पोलिस ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, वास्तविक धर्मवीर चित्रपटात आमच्या (Aanand Dighe)आनंद दिघे यांच्या तोंडी (Datta Dalvi)दत्ता दळवी यांनी वापरलेला शब्द जशाच्या तसा टाकण्यात आला आहे. तो शब्द सेन्सॉर बोर्डानेही काढलेला नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी दत्ता दळवी यांची पाठराखण केली आहे.