
नागपूर : पणजी येथे येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मिनीगोल्फ या खेळात सुवर्ण पदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर व कांचन दुबे तसेच रजत पदक विजेते पायल साखरे व निहाल बगमारे या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.
इंडियन ओलंपिक असोसिएशन, भारत सरकार, गोवा ओलंपिक असोसिएशन व गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मिनिगोल्फ या खेळाचे आयोजन गोव्याच्या पणजी शहरात मीरामार बीच येथे करण्यात आले होते.
माजी महापौर संदीप जोशी, रितेश गावंडे, साहेबराव इंगळे, दिलीप दिवे, रमेश शिंगारे व अजय हिवरकर आदी सामाजिक कार्यकर्ते खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी उपस्थित होते.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















