ओबीसी आरक्षणात काँग्रेसचे कवडीचे योगदान नाही -संजय गाते

0

 -सिंदखेडराजा येथे मोदी सरकारच्या 9 वर्षातील योजनांचे प्रदर्शन

नागपूर -ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळाले यात काँग्रेसचे कवडीचे योगदान नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ पंजाबराव देशमुख यांनी याकडे लक्ष वेधले. मात्र काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध करणे कायम ठेवले. काकासाहेब कालेकर आयोगाने अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल दिला होता मात्र नेहरू सरकारने ओबीसी आरक्षण देण्यास नकार दिला. एक प्रकारे ओबीसी आरक्षणाचा खून काँग्रेस सरकारने केला असा घणाघाती आरोप आज भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यानो केला. वर्षानुवर्षे पूर्ण बहुमताने सत्तेत असूनही ओबीसी कल्याण, गरिबांचे हित साधणे त्यांना कधीही जमले नाही. केवळ हिंदू, मुस्लिम मतभेदावरच त्यांचे राजकारण फिरत राहिले असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या ओबीसी जागरण यात्रेच्या निमित्ताने सिंदखेड राजा येथे ते मार्गदर्शन करीत होते. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या 9 वर्षांच्या उपलब्धीबद्दल ओबीसी समाजाच्या हितासाठी केलेल्या विविध योजनाची माहिती असणारे एक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते प्रदेश प्रभारी,माजी आमदार डॉआशिष देशमुख अर्चना डेहनकर, सहसंपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण आदी सर्व मान्यवरांनी भेट देत या लक्षवेधी प्रदर्शनाची प्रशंसा केली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत ओबीसी कल्याणविषयी योजना, मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती घेतली.