(New Delhi)नवी दिल्ली– (EVM)ईव्हीएमच्या प्राथमिक तपासणीबाबत दिल्ली (Congress) कॉंग्रेसने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्राथमिक स्तरावरील तपासणीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कारवाईला कॉंग्रेसने विरोध केला होता.
न्यायालायने म्हटले आहे की, ही प्रक्रिया परिपूर्ण असून प्रत्येक पक्ष त्यावर विश्वास ठेवू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण देशभरात राबवण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधले. दिल्ली कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून २०२४ च्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये काही त्रुटी असल्याचा आरोप केला होता. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली प्रदेश काँग्रेसला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच कॉंग्रेसच्या या याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्यासही नकार दिला.
















