(Mumbai)मुंबई– सत्ताधारी शिवसेनेतील म्हणजेच (Shinde Group)शिंदे गटातील 7 ते 8 आमदारांनी स्वगृही परतण्यासाठी (Former Chief Minister Uddhav Thackeray)माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा (Thackeray group MP Vinayak Raut)ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांची बंडखोरी व बंडखोर राष्ट्रवादीचा सत्तेतील सहभागानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी हा दावा केलाय. अजित पवारांच्या सरकारमधील समावेशाने शिंदे गटातील अनेक नेते नाराज असून त्यापैकी 7 ते 8 आमदारांनी स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा राऊतांनी केलाय. दरम्यान, त्यांचा दावा (State Industries Minister Uday Samant)राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला आहे. शिंदे गटात कुणीही नाराज नाही तसेच (Chief Minister Eknath Shinde )एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही देणार नाहीत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
विनायक राऊत म्हणाले की, आमच्या संपर्कात असलेल्या शिंदे गटातील आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. ही नावे मी आताच सांगणार नाही. पण ते आमदार मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आहेत. यात मंत्रिपदावर डोळा ठेवून बसणाऱ्या आमदारांचाही समावेश आहे. विशेषतः मंत्रिपदे जाण्याची शक्यता असणाऱ्यांचाही यात समावेश आहे, असा दावाही त्यांनी केला.
काय म्हणाले सामंत?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. कुणीही दिवास्वप्ने पाहू नयेत. राष्ट्रवादीच्या सहभागामुळे शिवसेनेत कुणीही नाराज नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि शिंदेंच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील.