नवीन आणि जुने चंद्रपूर यांना जोडणा-या   शहरातील राम सेतू पुलावर आकर्षक रोषणाई

0

 केबलस्टेड पुलावरील या दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण उत्साहात

(Chandrapur) नवीन आणि जुने चंद्रपूर यांना जोडणा-या शहरातील राम सेतू पुलाला आता आकर्षक रोषणाईची झळाळी मिळाली आहे.(District Guardian Minister Sudhir Mungantiwar) जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या केबलस्टेड पुलावरील या दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण उत्साहात पार पडले. चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवरील पूल आता विद्युत रोषणाईने झळाळणारा देशातील तिसरा पूल असेल. देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असलेला पूल आपल्या जिल्ह्यात असणार आहे, याचा अभिमान असल्याची भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पणप्रसंगी व्यक्त केली. (Mumbai)मुंबई आणि पणजीच्या (Goa)(गोवा) धरतीवर हा रामसेतू उभारण्यात आला आहे.  चंद्रपूर शहरातील नागरिकच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा ही रोषणाई आकर्षित करणार आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांना कुटुंबासह जाण्यासाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे जगातील मोठे पर्यटन केंद्र आहे. या केंद्राला जगभरातील पर्यटक भेटी देतात. आता रामसेतूवरील आकर्षण रोषणाई त्यांचेही लक्ष वेधून घेणार आहे.