नक्षलवाद्यांच्या दोन हजारांच्या नोटा बदलताना दोघांना अटक

0

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई,

(Gadchiroli) नक्षलवाद्यांकडील 2 हजाराच्या नोटा  बँकेत जमा करण्यासाठी जाताना दोन युवकांना गडचिरोली पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. (Rohit Mangu Corsa)रोहित मंगू कोरसा रा. (Etapalli)एटापल्ली आणि (Willab Girish Sikdar)विल्लब गिरीश सिकदर रा. पानावर जि. कांकेर असे आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून तब्बल 27 लाख 62 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. केंद्र शासनाने 30 सप्टेंबर नंतर  2 हजाराच्या नोटा चलनातून बाद केले आहेत. त्यामुळे या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. अशातच नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडे असलेल्या नोटा विविध माध्यमातून बदलून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विशेष अभियान पथकाचे जवान (Aheri)अहेरी येथे नाकाबंदी केली असता, दोन युवक दुचाकीवरून येतात संशयितरित्या आढळून आले. त्यांची चौकशी केली असता 2 हजार रुपयांच्या 607 नोटा, 500 च्या 372 नोटा, 200 रुपयांच्या 7 नोटा आणि शंभर रुपयाचे 106 नोटा अशी एकूण 27 लाख 62 हजार रुपयाची रक्कम आढळून आली. या रकमे संदर्भात अधिक चौकशी केली असता दोघांनीही समाधानकारक उत्तर दिली नाही. मात्र पोलिस खाक्या दाखवताच दोघांनीही ही रक्कम नक्षलवाद्यांची असल्याचे सांगून 2000 च्या नोटा बदलवण्यासाठी दिल्याचे सांगितले. दोघांवरही युएपीए एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.