गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी पहिल्याच दिवशी शिक्षणापासून वंचित

0

 जड वाहतुकीमुळे (Ashti)आष्टी- (Alapalli)आलापल्ली महामार्गाची दुरवस्था

खड्डे आणि रस्ता दुरावस्थेने एसटी बसेस झाल्यात बंद,

(Surjagad)सुरजागड लोह खनिज जड वाहतुकीमुळे रस्ते झाले खड्डेमय

(Gadchiroli)गडचिरोली जिल्ह्यात आजपासून शालेय सत्र सुरु झाले.  एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतील जड वाहतुकीमुळे आष्टी- आलापल्ली महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ST बसेस पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे  बस ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सायकलस्वार विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरिता  देशाच्या  राष्ट्रपती महोदय जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्याकरिता राज्य शासन आणि  प्रशासन यंत्रणा  कामाला लागली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याने संतप्त गावकरी, विद्यार्थी आणि अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने सुभाषनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन उग्र होत असल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या व सोमवार पासून नियमित बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.