
विविध कारणांनी मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा उच्च शिक्षणात वाढलेला टक्का आशादायी आहे. सोबतच विद्यार्थिनींची कामगिरीदेखील कौतुकास्पद असून महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. दीक्षांत समारंभात सुमारे ४५ पदवीधर आणि ६१ टक्क्यांपेक्षा जास्त सुवर्णपदक विजेत्या या विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनींची कामगिरी ही कौतुकास्पद असून महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. इतर विद्यार्थिनींना यापासून प्रेरणा मिळेल. गोंडवाना विद्यापीठ हे या क्षेत्रातील वनसंपदा, खनिज संसाधन, आदिवासींची कला आणि संस्कृतीच्या योग्य विकास आणि संरक्षणासाठी कार्यरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.