नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका

0

 

(Yavatmal)यवतमाळ – खरीप हंगामात अतिवृतष्टीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. या संकटातून सावरत शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. आता पीक काढणीला आले असताना गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा शेतकर्‍यांना बसला. बाभूळगाव, उमरखेड व महागाव तालुक्यातील गहू, हरभरा, तूर, भाजीपाला, संत्रा या पिकांचे नुकसान झाले. तीन तालुक्यात जवळपास नऊ ते दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.

गारपिटीमुळे शेतकरी हादरून गेला असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. कृषी विभागाने यंत्रणेला सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ यांनी दिली,.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा