
नागपूरला पहिल्यांदाच मिळाला मान
(nagpur)नागपूर, 10 फेब्रुवारी
स्थानिक प्रतिष्ठीत कंपनी सेक्रेटरी दीप्ती जोशी यांची इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) च्या सचिवपदी 2024-25 साठी निवड झाली आहे. ‘WIRC’च्या कार्यकारी मंडळावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या नागपूरकर कंपनी सेक्रेटरी ठरल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
WIRC कडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोवा ही 5 राज्ये आणि दमण-दीव व दादरा-नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या व्यवस्थापनाचे कार्यभार आहे.
(Deepti Joshi)दीप्ती जोशी ICSI च्या फेलो सदस्य, दीप्ती जोशी अँड असोसिएट्सच्या संस्थापक सदस्य असून POSH च्या अधिकृत ट्रेनर आहेत. त्यांना अखिल भारतीय स्तरावर कॉर्पोरेट सल्लागार म्हणून काम करण्याचा 15 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी 2023 साली WIRC च्या विद्यार्थी समितीचे नेतृत्व केले असून शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक कार्यक्रम, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आदी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे रिजनल स्टुडंट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला संपूर्ण प्रदेशातून उदंड प्रतिसाद लाभला होता.