संविधान कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही..”: देवेंद्र फडणवीस

0

नागपूर NAGPUR -संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येत नाही आणि हे कुणाच्याही बापालाही शक्य नाही, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते Prakash Ambedkar  प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दिले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान सन्मान महासभे’त प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित असल्याचा आरोप केला. (DCM Devendra Fadnavis on Constitution)

आंबेडकरांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत आणि याची पूर्ण कल्पना आहे की, भारताच्या संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही. कुणालाच म्हणजे कुणालाच नाही. संविधानात तशी तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणार हा एक निवडणुकीतील जुमला आहे. कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही. निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात. अर्ध्या लोकांचे ‘संविधान बदलणार’ असे सुरू होतं, तर अर्ध्या लोकांचे ‘मुंबई तोडणार’ असे चालू होते. आता हे वारंवार ऐकावे लागेल. पण मुंबई कुणी तोडू शकत नाही, संविधान कुणी बदलू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.