नवी दिल्ली ( NEW DELHI )-संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज (No Confidence motion) चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे (MP Tarun Gogoi ) खासदार तरुण गोगोई यांनी चर्चेची सुरुवात केली. २०१४ नंतर मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची ही दुसरी वेळ असून तीन दिवस ही चर्चा चालणार आहे. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
लोकसभेत सरकारकडे बहुमत आहे की नाही, हे तपासण्यासाठी अविश्वास प्रस्तावाचा नियम करण्यात आला आहे. कोणत्याही सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणता येतो. तो पारित करण्यासाठी लोकसभेत उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या एकूण खासदारांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान आवश्यक आहे. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नसला तरी यानिमित्ताने सरकारच्या विरोधात बोलण्याची संधी विरोधकांनी घेतली आहे.