दीनदयाल भरड थालीचे मंगळवारी लोकार्पण

0

संदिप जोशी यांची माहिती

नागपूर (Nagpur). विदर्भच नाही तर मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chattisgadh),तेलंगणातील गोरगरिब रुग्णांसाठी मेडिकल हे आशेचा एकमेव किरण आहे. दारिद्र्य रेषेखालील अशा गरिबांना किमान एक वेळचे जेवण मिळावे, यासाठी श्री. सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनने मेडिकलमध्ये पंडित दीनदयाल थाली अभियान सुरू केले आहे. मानव सेवेचा हा यज्ञ असाच सुरू राहणार आहे. पुढच्या टप्प्यात सायंकाळच्या वेळी दररोज रुग्णांच्या नातेवाईकांना सकस, सात्विक अन्न मिळावे यासाठी भरड थाली हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. मंगळवारपासून दीनदयाल थालीचा उपक्रम सुरू केला जाऊल. सकाळनंतर आता सायंकाळी रुग्णांच्या ताटात भरड थालीतून अन्न वाढले जाईल. यात बाजरी, मका, ज्वारीसह कडधान्य आणि भाज्यांचा समावेश असेल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संदिप जोशी (Sandip Joshi )यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेला पराग सराफ (Parag Saraf), रितेश गावंडे (Ritesh Gawande), गजानन निशीतकर (Gajanan Nishitkar), बंडूभाऊ राऊत  (Bandubhau Raut)आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Sarsangchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Dr. Mohan Bhagwat) यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी 6.30 हा उपक्रम लोक सेवेत अर्पण होईल. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), आमदार मोहन मते (Mohan Mate), जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar), मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन (Municipal Commissioner B. Radhakrishnan), अधिष्ठाता डॉ. राज गजभिये (Dr. Raj Gajbhiye), वैद्यकीय अधिक्षक डॉ. शरद कुचेवार (Medical Superintendent Dr. Sharad Kuchewar)आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

आतापर्यंत 16 लाख गरजूंच्या पोटात अन्न

श्री. सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनने मेडिकलमध्ये पंडित दिनदयाल थाली अभियान सुरू केले. या उपक्रमातून आतापर्यंत 16 लाख 50 हजारांहून अधिक जणांचे पोट भरता आले. या उपक्रमाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवारी 25 एप्रिलला कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मेडिकलमध्ये भरडथाली हा नवा उपक्रम राबविला जाणार आहे.

रुग्णांच्या सोयीसाठी लवकरच मदत कक्ष

मेडिकलमध्ये उपचाराला येणारे बहुतांश रुग्ण बाहेरगावाहून रेफर केलेले असतात. अशा वेळी रुग्णांना नेमके कोणत्या वॉर्डात जायचे याची माहिती नसते. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक गोंधळून जातात. या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच दिनदयाल मदत कक्ष स्थापन केला जाणार आहे. नातेवाईकांना या कक्षातून 365 दिवस 24 तास मदत उपलब्ध होईल. त्यासाठी 6 मेडिकल सोशलवर्करची नियुक्ती केली जाणार आहे.