नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज रविवारी पुन्हा एकदा विदर्भ दौऱ्यावर विशेष विमानाने आगमन झाले. पवार यांच्या नागपूर व अमरावती दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मध्यंतरी ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या जागेच्या पाहणी संदर्भात आले होते. त्यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याकडे आमरसाचे स्नेहभोजन देखील घेतले. आज स्वागताचा स्वीकार केल्यानंतर कारने अमरावतीकडे रवाना झाले. राष्ट्रवादी कृषी पदवीधर यांच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. आजच रात्री साडेआठ वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे. माजी मंत्री आ.अनिल देशमुख यावेळी सोबत आहेत.