केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात दिल्ली सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

0

(NEW DELHI )नवी दिल्ली: दिल्लीच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केंद्र सरकारने विरोधात निर्णय दिल्यावर केंद्र सरकारने आता या मुद्यावर अध्यादेश आणण्याची तयारी सुरु केली आहे. (Delhi Government to Appeal in Supreme Court) या अध्यादेशावरून राजकीय वातावरण तापविण्याचे आम आदमी पार्टीचे प्रयत्न सुरु असून दिल्ली सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. या अध्यादेशाला राज्यसभेत विरोधकांनी विरोध करावा यासाठी (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. पण, त्यांच्या या प्रयत्नांना अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेश असंवैधानिक असून त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी दिल्ली सरकारने याचिकेतून केली आहे. आपकडून केंद्राच्या अध्यादेशाच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी जाहीर स्वरुपात हा कार्यक्रम होणार असून ५ जुलै रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात तर ६ जुलै ते १३ जुलै दिल्लीतील वस्त्यांमध्ये या अध्यादेशाच्या प्रती जाळण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आपने जाहीर केले आहे.