कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांची विधान भवन परिसरात निदर्शने

0

 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला  Winter Session of the Legislature आज नागपुरात सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी विधान भवन परिसरात शेतकऱ्यांच्या समस्यावर जोरदार निदर्शने केली. खोके सरकार हाय हाय शेतकरी विरोधी सरकार हाय हाय, शेतकरी झाला कासावीस खोके सरकार 420, कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे, अशा घोषणांनी विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला.
संत्रा, सोयाबीन, धान व अन्य पिकांना योग्य भाव मिळालाच पाहिजे अशाही घोषणा विरोधी पक्ष देत होते. यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनते येथे बाळासाहेब थोरात, शादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते यावेळी उपस्थित होते.