नवाब मलिक अखेर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात

0

 

NAGPUR नागपूर-राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. आज मलिक हे विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी मुख्य प्रतोद अनिल पाटील उपस्थित होते. विधान सभेत मलिक सत्तारुढ बाकावर बसल्याने त्यांची राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे.hiwali adhiveshan 2023 
राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावेळी मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यांची अजित पवार गटाच्या कार्यालयातील आणि सत्तारुढ बाकांवरील उपस्थिती लक्षात घेता ते या गटात सामील झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. (NCP Leader Nawab Malik)
विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजित पवार गटाला मिळाले आहे. त्यामुळे आता शरद पवार गट काय पवित्रा घेणार याकडे लक्ष लागलेले होते. सुमारे दिड वर्ष कारागृहात राहिल्यावर मलिकांना आरोग्याच्या मुद्यावर जामीन मंजूर झालाय. हा जामीन मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे नवाब मलिक अजित पवार गटाशी जुळवून घेतील, अशी स्थिती आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नवाब मलिक आमदार आहेत, ते स्वतःचा निर्णय घेण्यासाठी खंबीर आहेत. सभागृहात कोणी कुठे बसायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा आहे. आज ते आले माझा आणि त्यांचा सकाळी फोन झाला, असेही त्यांनी सांगितले.