Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा

0

Pune Airport Renamed: जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नावासंदर्भातील प्रस्ताव सरकारला दिला होता.पुणे: पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आज देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.( Pune Airport Renamed Jagadguru Sant Tukaram Maharaj)

 

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नावासंदर्भातील प्रस्ताव सरकारला दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. आज ते पुण्यात पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.

नवीन विमानतळ तयार करण्यात येणार आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. पंरतु पुण्यात जे विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे, त्याचं नामकरण जगदगुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशीसंकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ काम आम्ही सुरू केलंय.

येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं, तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

 

Previous articleAir Marshal Amar Preet Singh : हवाई दल प्रमुखपदी यांची नियुक्ती
Next articleNitin Gadkari : “मेरी गलती हुई”
Priyanka Thakare
प्रियंका ठाकरे, ही शंखनाद न्यूज चॅनेलमध्ये न्यूज अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे. २०२३ पासून ती पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून मासकम्युनिकेशनमध्ये एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. फिल्ड रिपोर्टींग, विविध विषयावर तज्ज्ञाच्या मुलाखती घेतल्या आहेत. Shanknaad is a multilingual news channel available in Hindi, Marathi, and English. It covers news from across the country, including Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh, Chhattisgarh, Delhi, and Mumbai. The channel focuses on a variety of topics such as politics, social causes, sports, employment, religion, lifestyle, business, and food. With the growing consumption of digital media and the majority of the global population active on social media platforms like Facebook, Twitter, Instagram, and YouTube, Shanknaad is also accessible to its users on these platforms.