Home Artical Blog महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सदैव अग्रेसर-देवेश कुमार, महाप्रबंधक

महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सदैव अग्रेसर-देवेश कुमार, महाप्रबंधक

0

महिलांच्या सबलीकरणासाठी वर्ध्यात कौशल्य विकास प्रशिक्षण

चंद्रपूर(Chandrapur): महिला हा समाजाच्या प्रगतीचा कणा असताना, महिलांना योग्य भागीदारी व कौशल्याच्या माध्यमातून त्यांच्या सबळीकरणा साठी तसेच आर्थिक उन्नतीकरिता धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या वतीने विविध उपक्रम पहेल मल्टिपर्पज सोसायटीच्या माध्यमातून राबविले जातात. या समाजोपयोगी भावनेतून महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था (एम.गिरी) येथे विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपक्रमाचे मार्गदर्शक धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे महाप्रबंधक देवेश कुमार यांनी दिली.
उद्योगाच्या माध्यमातून विविधांगी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, मूलभूत सेवा-सुविधा तसेच विकासात्मक असे अनेक उपक्रम हे रांगेने होत असतांना शेणगाव, मोरवा आणि पांढरकवडा येथील एकूण 12 महिलांच्या आर्थिक सबळी करणासाठी होत असलेल्या या उपक्रमाबद्दल देवेश कुमार यांनी समाधान व्यक्त करीत भविष्यात असे उपक्रम नित्यनियमाने व उत्साहाने आयोजित केले जातील असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था (एम.गिरी) चे दीप वर्मा, सचिन राऊत आणि संदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सदर उपक्रम धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिष कुमार, CSR चे उप व्यवस्थापक प्रतीक वानखेडे यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. प्रशिक्षण सत्रादरम्यान प्रशिक्षक राजेंद्र गोंदाने यांनी एलईडी बल्ब असेंब्ली, डीसी/एसी एलईडी दुरुस्ती तसेच स्ट्रीट लाईट दुरुस्ती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांना बल्बचे विविध घटक, बिघाड ओळखण्याच्या पद्धती आणि प्रत्यक्ष दुरुस्तीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सहभागी महिलांनी प्रत्यक्ष सराव करून आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात केले.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये तांत्रिक ज्ञानाची वाढ होण्यासोबतच स्वयंरोजगाराच्या नव्या संधींबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात एलईडी व स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.