माझा फोटो वापरू नका, शरद पवारांचा बंडखोरांना इशारा

0

 

नागपूर: जिवंतपणे माझा फोटो कोणी वापरावा हा माझा अधिकार आहे त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो फोटो कोणीही वापरू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांना उद्देशून दिला आहे.
शरद पवार यांनी नमूद केले आहे की, ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, त्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.