रोहित पवारांना ईडीचा समन्स

0

 

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार अडचणीत आले आहेत. रोहित पवार यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यांना बुधवार २४ जानेवारी रोजी चौकशी बोलावण्यात आले असून बारामती अॅग्रोशी संबंधित प्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत कारखान्यांची जी विक्री झालेली होती, त्यात रोहित पवार यांचे नाव आलेले होते. त्याच प्रकरणात रोहित पवारांना ईडीने समन्स पाठवलेले आहे. या चौकशीसाठी रोहित पवार जातात का, याकडे लक्ष लागलेले आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती अॅग्रोसह रोहित पवारांशी संबंधित काही ठिकाणांवर छापे घातले होते. त्यानंतर आता ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, आपल्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live