आणि पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला..!

0
pm narendra modi

सोलापूर SOLAPUR 

-पंतप्रधान नरेंद्र मोदी  NAREDRA MODI यांनी आज सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले. तर देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे लोकापर्ण या निमित्ताने झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला. ते भावूक झाले. “मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळाले हवे होते..” असे सांगताना मोदींचा कंठ दाटून आला. काही सेकंद ते तसेच या भावूक अवस्थेत उभे होते. त्यामुळे मंचावर देखील अस्वस्थ वातावरण होते.

सोलापूरमध्ये असंघटित आणि विडी कामगारांसाठी ३५० एकर परिसरात ८३४ इमारती आणि ३० हजार फ्लॅट अशी ही वसाहत आहे. ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, आज १ लाख पेक्षा जास्त परिवारांचा गृहप्रवेश होईल. माझा आनंद वाढणार की नाही? सर्वजण आपल्या घरात रामज्योती प्रजवलित करणार की नाही? आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालेय. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवे होते, असे म्हणताना पंतप्रधानांचा कंठ दाटून आला. काहीकाळ ते भावनाविवश अवस्थेत होते. यानंतर सेकंद थांबत त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे, असे सांगत त्यांनी मराठीतून भाषण सुरु केले.