आयशर ट्रक्स आणि बसेसचा मुंबईत विस्तार

0

मुंबई (Mumbai), २३ मार्च  : महाराष्ट्रात आपला ठसा वाढवत, व्हीई कमर्शिअल व्हेईकल्सचे व्यावसायिक युनिट आयशर ट्रक्स अँड बसेसने मुंबईत नवीन थ्रीएस डीलरशिपच्या उद्घाटनासह आपला धोरणात्मक विस्तार सुरू केला आहे. सर्व-नवीन एव्ही मोटर्स डीलरशिप मुंबई आणि आसपासच्या भागातील ग्राहकांना आयशर आपली सेवा देणार आहे. या माध्यमातून आयशर ट्रक आणि बस ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा आयशरचा उद्देश असल्याचे आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

भिवंडीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर महामार्गालगत धोरणात्मकदृष्ट्या वसलेले, डीलरशिप स्थानिक ग्राहकांना आणि नाशिक ते मुंबई आणि न्हावा सेवा बंदरात प्रवास करणाऱ्या वाहनांना सेवा देणार आहे. आशियातील सर्वात मोठे वेअरहाऊसिंग हब म्हणून भिवंडीला ओळखले जाते.

या ठिकाणी एरिया, स्पेअर पार्ट्स सेक्शन, युटिलिटी रूम्स, ड्रायव्हर सुविधा, व्हील अलाइनमेंट सुविधा आणि एक समर्पित प्रशिक्षण कक्ष देखील आहे, ज्यामुळे ग्राहकांना सर्वांगीण सेवेचा अनुभव मिळेल.

नवीन डीलरशिपच्या उद्घाटनाबाबत भाष्य करताना विनोद अग्रवाल यांनी आयशरच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर भर देताना सांगितले की, “आयशरमध्ये, डीलरशिप नेटवर्कचा आमचा सतत विस्तार ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी संरेखित आहे. उत्कृष्ट सेवा आणि वाहन अपटाइमद्वारे आमच्या ग्राहकांची उत्पादकता आणि नफा वाढवणे हे आमचे ध्येय आहे. मी एव्ही मोटर्सच्या टीमला त्यांच्या नवीनतम सुविधा सुरू केल्याबद्दल माझ्या शुभेच्छा देतो.”

भिवंडी डीलरशिप व्यतिरिक्त, एव्ही मोटर्स पनवेल, नालासपोरा आणि मीरा रोड येथे इतर तीन शाखा चालवते. प्रत्येक सुविधा आयशर ट्रक आणि बस ग्राहकांना सर्वोत्तम सेवा अनुभव देण्यासाठी समर्पित आहे. आयशरला त्याच्या प्रगत टेलिमॅटिक्स सोल्यूशनसह १०० टक्के कनेक्टेड श्रेणीतील वाहनांची ओळख करून देणारी पहिली कंपनी आहे.