जागावाटपाच्या चर्चेपूर्वीच काँग्रेस, ठाकरे गटात मोठा वाद

0

 

(MUMBAI)मुंबई-इंडिया आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरुच व्हायची असताना काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात मोठा वाद सुरु झाला आहे. राज्यात लोकसभेच्या २३ जागा लढविणार असल्याचे ठाकरे गटाने जाहीर केले असतानाच त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला. शिवसेना पक्ष फुटल्याने त्यांचा हा दावा योग्य नाही, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तर आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही, या शब्दात खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले. राऊत म्हणाले, आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबरच आहे. शिवसेनेने याआधी २३ जागा लढवलेल्या आहेत. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्या २३ जागांवर शिवसेना लढणार आहेच, ही आमची भूमिका आहे. जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, पण काँग्रेसकडे एकतरी जिंकलेली जागा आहे का? काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या २३ जागांच्या मागणीवर आक्षेप घेताना (Congress leader Sanjay Nirupam) काँग्रेस नेते संजय निरूपम म्हणाले की, (Sanjay Raut)संजय राऊत २३ जागांची यादी घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचे? वंचित बहुजन आघाडीने बारा जागांचा प्रस्ताव दिल्याची बातमी मीडियामध्ये पाहिली. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांनी काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असेही निरुपम म्हणाले. शिवसेनेच्या जागांच्या मागणीवर (Congress leader Ashok Chavan)काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणे गरजेचे आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात आहेत. पण सध्याच्या परिस्थितीमद्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची २३ जागांची मागणी खूप जास्त होतेय, असेही ते म्हणाले.