तरुणांना रोजगार केवळ ‘इंडिया आघाडी’च देणार-राहुल गांधी

0

(NAGPUR)नागपूर– “केंद्रातील मोदी सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना गरीबीत ढकलेले आहे. भारतातील तरुण वर्ग सोशल मिडियावर जगू शकत नाही. त्यांना रोजगार हवा असून तरुण वर्गाला रोजगार देण्याचे काम केवळ इंडिया आघाडीच करु शकते”, असा दावा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित महारॅलीत बोलताना केला. (Congress Maha Rally in Nagpur)

उमरेड मार्गावरील बहादुरा परिसरात आयोजित मोठ्या गर्दीच्या या महारॅलीत (Congress president Mallikarjun Kharge)काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेसचे वरीष्ठ नेते सहभागी झाले होते. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार व भाजपला टीकेचे लक्ष्य केले. (Rahul Gandhi) राहुल गांधी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी भाजपाचे एक खासदार मला लोकसभेत भेटले. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. घाबरतच ते मला म्हणाले ‘राहुलजी, तुमच्याशी बोलायचं आहे’. मी म्हटलं काय बोलायचं आहे? तुम्ही तर भाजपामध्ये आहात. मग त्यांच्या चेहऱ्यावर थोडा तणाव दिसला. मी विचारलं ‘सगळं ठीक आहे ना?’ मला म्हणाले ‘नाही. राहुलजी, भाजपामध्ये राहून आता हे सहन होत नाही. मी भाजपामध्ये आहे खरा.

पण माझे मन मात्र काँग्रेसमध्ये आहे. मी त्यांना म्हटले तुमचे मन का नाही लागत तिथे? तुम्ही खासदार आहात. तुम्ही मला संकेत देत आहात. तर म्हणाले ‘राहुलजी, भाजपात गुलामी चालते. जे वरून सांगितलं जाते, ते अजिबात विचार न करता करावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही. वरून आदेश येतात. जसे आधी राजा ऑर्डर देत असत, तसे आदेश येतात. ते पाळावे लागतात’. मात्र, काँग्रेसमध्ये आमचा छोट्यात छोटा कार्यकर्ता नेत्यांना हटकू शकतो. ते मलाही म्हणतात की तुमची अमूक गोष्ट आम्हाला आवडली नाही. त्यांच्या मताचा मी आदर करतो. पण, त्यांचे ऐकून घेतो. भाजपमध्ये तसे होत नाही.”
आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, “आज देशात आयएसमध्ये किती ओबीसी, दलित, आदिवासींना स्थान आहे. कंपन्यांमध्ये किती कर्मचारी या वर्गातून आहेत. या वर्गांना कुठेही भागिदारी मिळत नाही. भाजपच्या लोकांकडून या प्रश्नाचे उत्तर नाही. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली. भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. दिल्लीत आमचे सरकार येताच आम्ही जाती जनगणना करुन दाखवू.”
“अनेक वर्षे संघ, भाजपचे लोक तिरंग्याला अभिवादन करत नव्हते. स्वातंत्र्याची लढाई देशातील जनतेने लढली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात देश नेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

केंद्रातील भाजपने सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगासह देशभरातील विद्यापीठांवर देखील कब्जा केला असल्याची टीका राहुल यांनी यावेळी केली. देशातील विद्यापीठांमध्ये एकाच संघटनेचे कुलगुरु आहेत. त्यांना काहीही येत नाही. त्यांची नियुक्ती मेरिटवर होत नाही, असेही ते म्हणाले.

मिडियाला लोकशाहीचा रक्षक म्हटले जाते. मात्र, आज मिडिया देशातील लोकशाहीची रक्षण करीत आहे का, असा माझा प्रश्न आहे. पत्रकार स्वतःच्या भावना मांडू शकत नाहीत. प्रसार माध्यमे दबावात आहेत. सीबीआय, ईडीचा त्यांच्यावर दबाव आहे. आम्ही देशातील जनतेचा देशाची शक्ती देऊ इच्छितो, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रातील जमिन ही काँग्रेस विचारधारेची आहे. येथील कार्यकर्ते बब्बर शेर आहेत. आपण सर्व महाराष्ट्र व देशातील निवडणूक जिंकणार आहोत, असा विश्वाही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.