

नागपूरात ३७.७१ लाखांच्या महागड्या विदेशी मद्य साठ्यासह मुद्देमाल जप्त
नागपूर, १० नोव्हेंबर (हिं.स.) : येथील धरमपेठ परिसरात ३७.७१ लाख रुपयांचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी निलय गडेकर याला अटक करून त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















