Home Artical Blog आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानकांच्या सुविधा वाढीस मिळणार गती

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानकांच्या सुविधा वाढीस मिळणार गती

0

मुंबईत मुनगंटीवारांच्या उपस्थितीत रेल्वे विषयांवर निर्णायक बैठक

चंद्रपूर(Chandrapur): राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर व बल्लारशा रेल्वे स्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी आज (२४ मार्च) रोजी मुंबई(Mumbai) येथे मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चंद्रपूर येथील रेल्वेलाईनलगत राहणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाचा मुद्दाही चर्चिला जाणार असून, दोन्ही स्थानकांवरील प्रवासी सुविधा वाढीस तसेच प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

या बैठकीत वर्धा–सेवाग्राम–बल्लारशा तृतीय रेल्वे लाईन व डंपिंग यार्ड प्रकल्पासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार ठोस पाठपुरावा करणार असून, जमीन अधिग्रहणासह प्रलंबित बाबींवर निर्णय होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी कमी होऊन मालवाहतूक व प्रवासी सेवा अधिक वेगवान होणार आहे. तसेच चंद्रपूर रेल्वे स्थानकाला कोचिंग टर्मिनल सुविधा देण्यासंदर्भातील प्रस्ताव, स्टेशन विस्तार, नवीन प्लॅटफॉर्म उभारणी व प्रवेशद्वार सुधारणा या कामांनाही या बैठकीत गती देण्याचा मुद्दा मांडला जाणार आहे.

यासोबतच बल्लारशाह–कुर्ला एलटीटी गाडी सीएसएमटीपर्यंत वाढवणे, काही साप्ताहिक गाड्या दररोज करणे तसेच विविध गाड्यांचा विस्तार बल्लारशाहपर्यंत करण्याच्या मागण्यांवरही आ. मुनगंटीवार ठोस भूमिका मांडणार आहेत. या बैठकीमुळे चंद्रपूर व बल्लारपूर परिसरातील नागरिक तसेच रेल्वे प्रवाशांच्या अनेक प्रलंबित मागण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी गुडन्यूज, महिन्याभरात होणार नवा बदल -  Marathi News | Mumbai Local Trains Update Central Railway give passenger  Real time Updates Soon see Local Train Info ...