फडणवीसांच्या शपथपत्र प्रकरणाचा निकाल ८ सप्टेंबरला

0

नागपूर NAGPUR  : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis Affidavit Case) यांच्या 2014 मधील निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणाची सुनावणी आता 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. यासंदर्भात दोन्ही बाजुंकडील युक्तिवाद पूर्ण झाला असून आता न्यायालयाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र,निकालाची तारीख 8 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

यासंदर्भात वकील सतीश उके हे याचिकाकर्ते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्हे नमूद न केल्याप्रकरणी न्यायालयीन लढा सुरु आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आधीच पूर्ण झाला असून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यासंदर्भात ८ सप्टेंबरला निकाल सुनावणार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नजरचुकीने राहून गेल्याचा युक्तिवाद फडणवीस यांच्या वतीने करण्यात आला आहे.