प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांचे मास्टर रेसिपी फेसबुक अकाऊंट हॅक

0

प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांचे मास्टर रेसिपी फेसबुक अकाऊंट हॅक करण्‍यात आले असून त्‍याद्वारे अश्लिल व्हीडिओ पोस्‍ट केले जात आहेत. विष्‍णू मनोहर यांनी सायबर क्राईम विभागाकडे तसेच फेसबुक व्यवस्थापनाला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

सोमवारी विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
मागील 35 वर्षापासून पाककला क्षेत्रात विष्‍णू मनोहर कार्य करीत असून त्‍यांचे मास्टर रेसिपी युट्यूब चॅनेल देखील आहे. या चॅनेलवरून ते विविध मराठी पाककृतींचे व्हिडीओ पोस्‍ट करत असतात. याशिवाय, फेसबुकवर या चॅनेल चे पेज देखील तेथे रेसिपी चे व्हिडिओ पोस्‍ट केले जातात. विष्‍णू मनोहर म्‍हणाले, विविध पदार्थ तयार करण्‍याचे कौशल्‍य दर्शकांना आत्‍मसात करता यावे तसेच, मराठी खाद्य संस्‍कृती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्‍ही हे चॅनेल सुरू केले आहे. या माध्‍यमातून मराठी पदार्थांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, हा आमचा उद्देश आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यातून कुठलाही आर्थिक नफा नसतो.

पण कोणीतरी माझे फेसबुक अकाऊंट हॅक केले असून त्‍याद्वारे अश्लिल व्हिडीओ पोस्‍ट करत आहे. असा प्रकार यापूर्वीही घडला असून त्‍याचा आम्‍ही वेळीच बंदोबस्‍त केला होता.

परंतु, यावेळीदेखील हे अकाऊंट हॅक झाल्‍यामुळे खाद्यप्रेमी आणि चाहत्‍यांना भरपूर मनस्‍ताप होत आहे. माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की, मला मदतच करायची असेल तर हेल्प मास्टीर रेसिपी मधे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता शिवाय कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता त्‍यांनी फेसबुकला त्‍यासंदर्भात तक्रार करावी. अकाउंट ल असलेली लिंक कोणी क्लिक करू नये अन्यथा तुमचे पण अकाउंट हॅक होईल, असे त्यांनी आवाहन केले आहे.
यावेळी विजय जथे उपस्थित होते.