वर्धा- वर्ध्यातील देवळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या जंगली जनावरांचा (रोही, रानडुक्कर, हरिण, माकडे) यांचा त्वरित बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढला. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान हे जंगली जनावरे करत असून नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना पाहिजे, नुकसान भरपाईसाठी मोठी कागदपत्राची यादी तयार करावी लागते, शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे, अशी खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. युवा संघर्ष मोर्चा या संघटनेच्या आयोजनात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती मोर्च्यात पाहायला मिळाली. वनविभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हातामध्ये रोही रानडुकरांचे पोस्टर घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. देवळी शहरातील भोंग सभागृह बस स्टँड जवळून हा शेतकरी धडक मोर्चा निघाला व देवळी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याची माहिती किरण ठाकरे , अध्यक्ष युवा संघर्ष मोर्चा यांनी दिली