
नागपूरच्या चार महिला रायडर्सचा “क्वीन्स ऑन द व्हील २.०” मध्ये सहभाग
– महिला दिनानिमित्त सीएसी ऑलराउंडरचे मध्य प्रदेशमध्ये विशेष आयोजन
नागपूर, ४ मार्च २०२५
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सीएसी ऑलराउंडर, नागपूरतर्फे मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या पाठिंब्याने “क्वीन्स ऑन द व्हील २.०” या खास महिलांसाठीच्या ‘बाईकींग टूर’ चे आयोजन करण्यात आले असून यात नागपूरच्या चार महिलांचा सहभाग आहे.
राईड लीडर एकता खंते, मैथिली सिंग, श्वेता बोरकर, ज्योती महाजन या नागपूरच्या चार बाईकिंग रायडर्स या “क्वीन्स ऑन द व्हील २.०” बाईकिंग टूरमध्ये सहभागी झाल्या आहेत. या बाईक रॅलीला भोपाळमधील विंड अँड वेव्हज हॉटेल येथून इलिया राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
या बाईकिंग टूरमध्ये देशभरातील 25 महिला रायडर्स सहभागी झाल्या असून त्या मध्य प्रदेशात ८ दिवसांच्या १,४०० किमीच्या साहसी प्रवास करणार आहेत. या प्रवासादरम्यान या २५ उत्साही रायडर्सना मध्य प्रदेशातील समृद्ध वारसा, चैतन्यशील संस्कृती आणि चित्तथरारक निसर्गाचा अनुभव घेतील. या प्रवासात सांची, चंदेरी, ग्वाल्हेर, ओरछा, खजुराहो, उदयगिरी आणि भीमबेटका यांचा समावेश राहील. ओरछा आणि खजुराहो येथे या महिला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष उत्सवात सहभागी होतील. स्थानिक महिलांतर्फे आयोजित विविध उपक्रमांमध्ये भाग घेतील व बुंदेलखंडी आदरातिथ्याचा अनुभव घेतील.
हा उपक्रम केवळ महिला सक्षमीकरण आणि साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नसून मध्य प्रदेशला महिला प्रवाशांसाठी एक सुरक्षित आणि साहसी ठिकाण म्हणून देखील सिद्ध करण्यासाठी असल्याचे मत सीएसी ऑलराउंडरचे संचालक, अमोल खंते यांनी व्यक्त केले आहे.
(अमोल खंते : ९३७००७२२२७)