
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय अधिवक्ता परिषद व डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ माता-पित्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ॲड. मुकुंद टंडन, प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा, ॲड. अप्रतिम दीक्षित, मातोश्री वृद्धाश्रमचे सहसचिव वसंतराव थोटे, सचिव अजय जयस्वाल, डॉ. पूजा मूर्तिजापूरकर, डॉ. जयश्री भुट्टे, डॉ. जयंता मूर्तिजापूरकर, डॉ. विजय निरंजने, डॉ. देवाशीष रॉय तसेच डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲड. राजेश जुनारकर यांनी या सेवा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात राहात असताना समाजाचे देणे फेडण्याची भावना जपणे आवश्यक असून त्यातूनच अशा सेवा उपक्रमांची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ॲड. मुकुंद टंडन यांनी आपल्या उद्बोधनातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे कायदेशीर मार्गदर्शन केले. समाजाचा विचार करून समाजाला योग्य दिशा देणे आणि न्यायाच्या माध्यमातून समाजसेवा करणे हे अधिवक्त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात जाऊन कार्य करण्याची आज अधिक गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. मनीष मुंधडा यांनी आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच समाजातील इतरांच्या आरोग्याबाबतही संवेदनशील राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले व या उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

मातोश्री वृद्धाश्रमचे सचिव अजय जयस्वाल यांनी वृद्धाश्रम प्रकल्पाची माहिती देत या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाल्याचे सांगितले आणि आयोजकांचे आभार मानले. या शिबिरामुळे वृद्धाश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिक आनंदित झाले. काही ज्येष्ठांनी अशा सेवा उपक्रमांमुळे आम्हाला मानसिक आधार मिळतो, अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन ॲड. सरोज कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. स्नेहल उरकांडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. तन्मय हलदर, डॉ. जयश्री भुट्टे, डॉ. जयंता मूर्तिजापूरकर, डॉ. पूजा मूर्तिजापूरकर, डॉ. विजय निरंजने, डॉ. देवाशीष रॉय तसेच वैद्यकीय मदत कार्यकर्ता शंकरजी राजकोंडावर यांनी सहकार्य केले. तसेच अखिल भारतीय अधिवक्ता परिषद व सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी ऍड नवले, ऍड रशीद शेख, ऍड गोपाल पाटील,ऍड मोहन निब्रड, ऍड स्वाती समर्थ, ऍड संदीप नागपुरे, ऍड देवेंद्र महाजन, ऍड विनय लिंगे, संदीप देशपांडे, ज्योती रामटेके, एकांत सोनटक्के यांनी अथक प्रयत्न केलेत.














