
(Chandrapur)चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात शेगडी दुरुस्तीच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट
गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानातील दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुकान बेचिराख झाले. सुदैवाने कोणतीही जिवहानी यात झाली नाही. ही घटना चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरात रात्री घडली. बल्लारपूर शहरातील वर्दळीच्या रेल्वे स्टेशन चौकात महामार्गावर हे गॅस शेगडी दुरुस्तीचे दुकान आहे. याच दुकानातील दोन सिलिंडर एका पाठोपाठ एक फुटले. या स्फोटामुळे हे दुकान पूर्णतः बेचिराख झाले. या दुकानाला लागूनच इतरही प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गांभीर्य लक्षात घेवून नगरपालिका आणि बल्लारपूर पेपर मिलच्या अग्नीशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















